अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरण; एफआयआर मधून नवी माहिती समोर
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरण; एफआयआर मधून नवी माहिती समोर
img
दैनिक भ्रमर
बदलापूरमधील शाळेमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपी अक्षय शिंदे ला अटक करण्यात आले होते. दरम्यान काल अक्षय शिंदे याचा काल पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला.तळोजा कारागृहातून जात असताना ही घटना घडली .अक्षय शिंदे याने तळोजा कारागृहातून जात असताना पोलिसांवर हल्ला केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे जखमी झाला होता. त्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.अशातच आता एफआयआरमधून संपूर्ण माहिती समोर आलीये. 

दरम्यान  पोलिसांनी तब्बल ४५ मिनिटांनंतर गाडी का थांबवली? असा सवाल देखील विचारला जात असतानाच एफआयआरमधून संपूर्ण माहिती समोर आलीये. पोलिस सरकारी वाहनाने दुपारी दोन वाजता मध्यवर्ती गुन्हे शाखा येथील ठाणे दैनंदिनीमध्ये नोंद करून तळोजा मध्यवर्ती कारागृहाकडे रवाना झाले. सायंकाळी साडेपाच वाजता तळोजा मध्यवर्ती कारागृह येथून आरोपी अक्षय शिंदे यांस कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ताब्यात घेऊन पोलीस पथक पोलीस व्हॅनने ठाणे शहराकडे निघाले. 

दरम्यान , सहाय्यक पोलिस निरिक्षक निलेश मोरे आणि 2 अंमलदार आरोपीसह वाहनाचे मागील बाजुस बसले होते. शिळ डायघर पोलीस ठाण्याजवळ आले असता मागे बसलेले पोलिस निरिक्षक निलेश मोरे यांचा गाडीत पुढे बसलेल्या वरिष्ठ पोलिस निरिक्षक सचिन शिंदे यांना फोन आला. त्यावेळी आरोपी अक्षय शिंदे शिवागाळ करत आरोडाओरड करत असल्याचं निलेश मोरे यांनी सचिन शिंदे यांना सांगितलं.

त्यानंतर पुढे बसलेल्या सचिन शिंदे यांनी गाडी बाजूला घेण्यास सांगितलं आणि गाडी थांबवली. आरोपी अक्षय शिंदे यास घेऊन मुंब्रा बायपास रोडवर मुंब्रा देवीच्या पायथ्या जवळ गेल्यावर आरोपीने निलेश मोरे यांच्या कमरेला लावलेलं पिस्तुल हिसकावलं अन् पोलिसांवर गोळी चालवली. मला जाऊ द्या, असं अक्षय शिंदे पोलिसांना म्हणत होता. त्यानंतर पोलिसांसोबत झालेल्या झटापटीमध्ये अक्षयला गोळी लागली अन् त्याचा मृत्यू झाला, असं एफआयआरमध्ये सांगितलं आहे.




इतर बातम्या
Join Whatsapp Group