अक्षय शिंदेचा पोस्टमॉर्टम  रिपोर्ट आला समोर, मृत्यूचं नेमकं कारण काय ?
अक्षय शिंदेचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, मृत्यूचं नेमकं कारण काय ?
img
दैनिक भ्रमर
बदलापूर येथील शाळेतील दोन चिमुकल्यांवर अत्याचार प्रकरणी अटक करण्यात आले होते दरम्यान काल अक्षय शिंदे याचा काल पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला.तळोजा कारागृहातून जात असताना ही घटना घडली .अक्षय शिंदे याने तळोजा कारागृहातून जात असताना पोलिसांवर हल्ला केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे जखमी झाला होता.  त्यातच त्याचा मृत्यू झाला. 

दरम्यान, आता  अक्षय शिंदेचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला आहे .पोस्टमार्टम अहवालानुसार त्याचा मृत्य अती रक्तस्त्रावाने झाला आहे. अक्षय शिंदेच्या डोक्याला एक गोळी लागल्याचं शवविच्छेदन अहवालात नमूद आहे. प्राथमिक शवविच्छेदन अहवाल मुंब्रा पोलिसांना सुपूर्द करण्यात आला आहे. 

दरम्यान , मागच्या 7 तासांपासून शवविच्छेदन अहवाल तयार केला जात होता. या संपूर्ण प्रक्रियेची व्हिडिओग्राफी करण्यात आली होती. 5 डॉक्टरच्या पॅनलने शवविच्छेदन केले आहे. 5 डॉक्टरच्या पॅनलने शवविच्छेदन केले आहे. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group