बदलापूरमध्ये चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचारानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे. बदलापूरच्या नामांकित शाळेमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. 2 आणि 13 ऑगस्ट रोजी सफाई कर्मचाऱ्याने दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केले.या घटनेनंतर बदलापूरचे नागरिक रस्त्यावर उतरले असून च्यांनी रेल रोकोही केला.
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेची दखल घेतली असून सरकारकडून SIT स्थापन करण्यात आली आहे. तसेच शाळेविरूद्ध कारवाईचे आदेश दिले आहेत. आरोपींना क्षमा केली जाणार नाही तसेच हे प्रकरण फास्ट ट्रॅक करण्याचे प्रयत्न असल्याचं म्हटलं आहे.
शाळा प्रशासनानेही घेतला निर्णय
या विषयी अधिक माहिती अशी की , याप्रकरणी हलगर्जीपणा दाखवलेल्या संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची तत्काळ बदली करण्यात आली आहे. तसेच, शाळा प्रशासनाने शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षिका आणि मुलांची ने आण करण्याची जबाबदारी असणाऱ्या दोन सेविकांचे निलंबन केले आहे.