बदलापूर अत्याचार प्रकरण;  ''त्या'' पोलिसांवर कारवाई, देवेंद्र फडणवीसांचा आदेश
बदलापूर अत्याचार प्रकरण; ''त्या'' पोलिसांवर कारवाई, देवेंद्र फडणवीसांचा आदेश
img
दैनिक भ्रमर
बदलापूरच्या नामांकित शाळेमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. 2 आणि 13 ऑगस्ट रोजी सफाई कर्मचाऱ्याने दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केले. या घटनेनंतर बदलापूरचे नागरिक रस्त्यावर उतरले असून च्यांनी रेल रोकोही केला. याप्रकरणी आता पोलिसांवरही कारवाई करण्यात आली आहे. 

बदलापूरच्या घटनेत प्रारंभीच्या काळात कारवाईमध्ये विलंब करणारे बदलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक आणि हेड कॉन्सटेबल यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना दिला आहेत.

या प्रकरणा विषयी अधिक माहिती अशी  की , बदलापूरच्या नामांकित शाळेत 12 आणि 13 ऑगस्ट रोजी सफाई कर्मचाऱ्याने दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केले. पीडित मुलींच्या पालकांना जेव्हा याबाबत लक्षात आलं त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. तसंच शाळेकडेही तक्रार करण्यात आली, पण शाळेकडून कठोर पावलं उचलली गेली नाहीत तर पोलिसांनीही तक्रार दाखल करताना दिरंगाई केल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group