धक्कादायक ! बायकोसोबत वेळ घालवता येत नाही म्हणून त्याने मुलीलाच...
धक्कादायक ! बायकोसोबत वेळ घालवता येत नाही म्हणून त्याने मुलीलाच...
img
दैनिक भ्रमर
एका मुलीचा सर्वात मोठा आधार हे तिचे वडील असतात. वडील सोबत असतील तर जग छोटं वाटायला लागतं. पण हाच आधार जर काळ बनत असेल तर.  मुंबईतील अँटॉप हिल परिसरातून धक्कादायक पितृत्वाला काळिमा फासणारी बातमी समोर आली आहे. 

इमरान शेख हा मुलीचा सावत्र बाप. त्याच्या पत्नीची ४ वर्षांची मुलगी रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर खेळत असे. त्यामुळे इमरानला त्याच्या पत्नीसोबत हवा तसा वेळ मिळत नव्हता. त्यामुळे त्याने मुलीसोबत धक्कादायक कृत्य केले आहे. 

पत्नीसोबत वेळ घालवता येत नसल्याने त्याची नेहमी चिडचिड होत असे. आणि याच रागातून त्याने मोठे पाऊल उचलले. इमरान शेख याने 4 वर्षांच्या सावत्र मुलीचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह कुलाबा समुद्रात फेकून दिला.

या संपूर्ण  घटनेचा पोलिसांनी तपास सुरु केला. संशयाची सुई ही इमरान शेख वरच होती. कारण मुलगी बेपत्ता झाल्यापासून तोही गायब होता. या प्रकरणाचा तपास वेगाने करत पोलिसांनी त्याला वरळीतून अटक केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group