आपल्या वादग्रस्त वस्तव्यांबरोबरच थेट विधानसभेच्या सभागृहामध्ये मोबाईलवर पत्त्यांचा डाव खेळल्याचा आरोप करण्यात आलेले राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंना सध्या तरी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलासा दिल्याची माहिती मिळत आहे.
अजित पवार आणि कोकाटे यांची आज मंत्रालयामध्ये बैठक झाली. या बैठकीदरम्यान अजित पवारांनी कोकाटेंना चांगलेच फैलावर घेतलं. त्यांनी केलेल्या विधानांवरुन अजित पवारांनी त्यांची कानउघाडणी केली. मात्र त्यांच्याकडून कृषीमंत्रिपद काढून घेण्यात आलेलं नाही. तसेच ते काढून घेतलं जाणार नसल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, कोकाटेंना भेटल्यानंतर अजित पवारांनी पक्षातील इतर नेत्यांचीही कॅबिनेटच्या बैठकीआधी छोटी बैठक घेतील. या बैठकीदरम्यान अजित पवारांनी सर्वच मंत्र्यांना सक्त ताकीद दिली आहे. सर्वच मंत्र्यांनी प्रसारमाध्यांशी बोलताना भान ठेवावे. तसेच सहसा बोलणे टाळा, असं अजित पवारांनी आपल्या पक्षातील सहकारी मंत्र्यांना सांगितलं आहे.
"महत्वाचे विषय असतील तरच बोला. तुमच्या एका शब्दाने पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे. जर कोणी काही चुकले तर माझ्याकडे यायचे नाही, तिथून मागे फिरायचं," असा सूचक इशारा अझित पवारांनी दिला आहे.