अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरण ; पोलिसांनी संरक्षणार्थ अक्षयवर गोळ्या झाडल्या, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरण ; पोलिसांनी संरक्षणार्थ अक्षयवर गोळ्या झाडल्या, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
img
दैनिक भ्रमर
बदलापुरातील एका शाळेत काम करणाऱ्या अक्षय शिंदे याने दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार केला होता.  त्याप्रकरणी त्याला अटक करण्यात करण्यात आली होती .  बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला आहे. दरम्यान , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटर कारवाईची माहिती राज्यातील जनतेला दिली. अक्षयने पोलिसांवर फायरिंग केल्याने तसेच हवेत गोळीबार केल्याने पोलिसांनी संरक्षणार्थ अक्षयवर गोळ्या झाडल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

अक्षय शिंदे याला चौकशीसाठी नेण्यात येत होते. अक्षयने पहिल्यांदा पोलिसांची बंदूक हिसकावून थेट पोलिसांवरच फायरिंग केले तसेच हवेतही गोळीबार केला. त्यामुळे स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी अक्षयवर गोळीबार केला. त्यानंतर त्याला दवाखान्यात नेण्यात आले. डॉक्टरांनी अधिकृत त्याला मृत्यू घोषित केलेले नाही परंतु जी माहिती मिळतीये त्यानुसार त्याचा मृत्यू झालेला असावा. त्यामुळे ठरवून केलेला गोळीबार वगैरे नसून पोलिसांनी स्वत:च्या संरक्षणासाठी गोळीबार केलेला आहे. असेही ते यावेळी म्हणाले.. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group