बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या घरावर जप्तीची नोटीस
बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या घरावर जप्तीची नोटीस
img
दैनिक भ्रमर
बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी महत्वाची अपडेट समोर आली आहे. न्यायालयीन चौकशीचा अहवाल आज हायकोर्टात सादर करण्यात आला त्या अहवालात ५ पोलिस अधिकाऱ्यांना दोषी ठरवलं आहे. तसेच आरोपी अक्षय शिंदे याच्या  घरावर बँकेने जप्तीची नोटीस बजावली असल्याची माहिती समोर आली आहे. 

अक्षय शिंदे यांचे वडील अण्णा शिंदे यांनी जना स्मॉल फायनान्स बँक या खाजगी बँकेकडून अडीच लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं. मात्र अत्याचार प्रकरणानंतर त्यांच्या घराची तोडफोड झाल्याने बदलापूर सोडून ते अज्ञात ठिकाणी वास्तव्याला गेले. त्यांना कोणताही कामधंदाही नसल्यामुळे कर्जाचे हप्ते देखील थकले. त्यामुळेच आता या बँकेने त्यांच्या घरावर थेट जप्तीची नोटीस लावली आहे.

जना स्मॉल फायनान्स बँकेकडून 4 डिसेंबर 2024 रोजी ही नोटीस लावण्यात आली आहे. नोटीस लावल्यापासून ६० दिवसात थकीत २ लाख १६ हजार रुपये रकमेचा भरणा करा, अन्यथा मॉर्गेज म्हणून दाखवलेलं त्यांचं घर ताब्यात घेऊन जप्त केलं जाईल, असा या नोटीसमध्ये उल्लेख आहे. या नोटीसची मुदत ४ फेब्रुवारीपर्यंत असून तोपर्यंत या रकमेचा भरणा केला जातो का? हे आता पाहावं लागणार आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group