अक्षय शिंदेच्या आई वडिलांनी पोलिसांवर केले गंभीर आरोप म्हणाले...
अक्षय शिंदेच्या आई वडिलांनी पोलिसांवर केले गंभीर आरोप म्हणाले...
img
दैनिक भ्रमर
बदलापूर येथे दोन चिमुकल्यांवर अत्याचार केल्या प्रकरणी आरोपी अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केली होती. बदलापूर पोलिसांकडून क्राईम ब्रांचकडे दिले जात असताना अक्षय शिंदे याने पोलिसांची बंदूक हिसकावून गोळ्या झाडल्या. त्यानंतर पोलिसांनी स्वरक्षणासाठी त्याला एन्काऊंट केल्याची माहिती पुढे येत आहे. अक्षय शिंदे याने पोलीस अधिकाऱ्याच्या पायावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर आत्मसंरक्षणासाठी पोलिसांनी गोळीबार केल्याची माहिती आहे. या प्रकरणात अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी स्वसंरक्षण करण्यासाठी त्याच्यावर उलट गोळीबार केल्याने या चकमकीत अक्षयचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिला नाही. 

दरम्यान यावर, अक्षय शिंदेच्या वडिलांनी प्रतिक्रिया देत पोलिसांवर गंभीर आरोप  केले  आहेत . अक्षय शिंदेला मी ३.३० वाजता भेटून आलो. अक्षय शिंदेला पैसे घेऊन मारुन टाकले आहे. त्याला पिचकारीची बंदूक माहित नाही. मग तो काय पोलिसांची बंदूक घेऊन फायर करणार का. पोलिसांनी आम्हाला काहीही सांगितलं नाही. आता मी बातमी पाहिली तेव्हा मला कळाले. असा आरोप अक्षय शिंदेच्या वडिलांनी केली आहे.

तसेच आरोपी अक्षय शिंदेच्या आईने आक्रोश करत  थेट पोलिसांवर आरोप केला आहे.  ''माझ्या पोराची वाट बघतेय, माझा पोरा असं करूच शकत नाही. माझा पोरगा असा नाही. दुसऱ्यानेच गुन्हा केला. आरोप माझ्या पोरावर दाखल केला. माझ्या पोरानं असं काही केलं असतं तर कामावर गेला नसता. माझा पोरगा भोळा आहे. त्याने असं काही केलं नाही. माझ्या पोराला गोळी घालून मारून टाकलं. आम्हाला मारून टाका आम्ही येतो. कोणत्या हॉस्पिटलला टाकलं तिथेच येतो, आम्हालाही मारा, असं अक्षयच्या आईने म्हटलं आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group