मुंबई : लहान मुले आणि तरुणांच्या आवडीचा सण एका दिवसावर येऊन ठेपला आहे. दहीहंडी हा सण मुंबई आणि नजीकच्या भागात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. दरवर्षी गोविंदा पथक मोठ्या उत्साहाने सण साजरा करत हंडी फोडून लाखो रुपयांचं मानधनाचे मानकरी होतात. मुंबई जवळील सानपाडा येथे सोन्याच्या दहीहंडीचं आयोजन केलं आहे. या दहीहंडीची जोदार चर्चा सुरू झाली आहे.
मुंबई जवळील नवी मुंबईतील सानपाडा विभागातील समाजसेवक पांडुरंग आमले यांच्या साई भक्त सेवा मंडळाने भव्य सोन्याच्या दहीहंडीचं आयोजन केलं आहे.
नवी मुंबईतील सोन्याची साईहंडी फोडण्यासाठी नवी मुंबई, मुंबई, ठाणे, रायगड आणि पुण्यातून गोविंदा पथक येतात. ही हंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकामध्ये मोठ्या प्रमाणात चढाओढ पाहायला मिळते.
नवी मुंबईतील ही सोन्याची दहीहंडी फोडण्यासाठी महिला गोविंदा पथकांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. नवी मुंबईतील या साईहंडी आणि व्यासपीठाची विधिवत पूजा संपन्न झाली. यावेळी अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. दरम्यान, उद्या या सोन्याच्या साईहंडीचा थरार पाहण्यासाठी नवी मुंबईकरांना मोठी गर्दी करण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग आमले यांनी केलं आहे.