सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी...! १० तोळ्याच्या दरात 'इतक्या' रुपयांनी घसरण, जाणून घ्या आजचे दर किती?
सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी...! १० तोळ्याच्या दरात 'इतक्या' रुपयांनी घसरण, जाणून घ्या आजचे दर किती?
img
Dipali Ghadwaje
आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याचे दर घसरल्याने ग्राहकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. १ तोळा सोन्याच्या दरात ६०० रुपयांनी घसरण झाली आहे. सोन्याचे दर सध्या ९८,७३० रुपये आहेत. काल सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. त्यानंतर आज भाव कमी झाले आहेत. त्यामुळे सोने खरेदीसाठी आजचा दिवस चांगला ठरु शकतो.

आजचे सोन्याचे दर  

२४ कॅरेट सोन्याचे दर

गुडरिटर्न्सनुसार, आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात ६०० रुपयांनी घसरण झाली आहे. १० ग्रॅम सोन्याचे दर ९८,७३० रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याच्या दरात ४८० रुपयांनी घसरण झाली आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर ७८,९८४ रुपये आहेत. १०० ग्रॅम सोन्याचे दर ९,८७,३०० रुपये आहे. १०० ग्रॅम सोन्याच्या दरात ६००० रुपयांनी घसरण झाली आहे.

२२ कॅरेट सोन्याचे दर

आज २२ कॅरेट सोन्याच्या दरात देखील घट झाली आहे. १० ग्रॅम सोन्याचे दर ९०,५०० रुपये आहे. काल हे दर ९१,०५० रुपये होते. या दरात ५५० रुपयांनी घसरण झाली आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर ७२,४०० रुपये आहेत. या दरात ४४० रुपयांनी घसरण झाली आहे. १०० ग्रॅम सोन्याच्या दरात ५५०० रुपयांनी घसरण झाली आहे.

१८ कॅरेट सोन्याचे दर

आज १ तोळा सोन्याचे दर ७४,०५० रुपये आहेत. या दरात ४५० रुपयांनी घसरण झाली आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर ५९,२४० रुपये आहेत. तर १०० ग्रॅम सोन्याचे दर ७,४०,५०० रुपये आहेत.

चांदीचे दर आज चांदीच्याही दरात घसरण झाली आहे. आज ८ ग्रॅम चांदीचे दर ८८० रुपये आहेत. १० ग्रॅम चांदीचे दर १,१०० रुपये आहेत. १०० ग्रॅम चांदीचे दर ११,००० रुपये आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group