सोन्याची हनुमान उडी ! सोन्याने गाठला नवा उच्चांक, २२ आणि २४ कॅरेटचे आजचे दर किती ?
सोन्याची हनुमान उडी ! सोन्याने गाठला नवा उच्चांक, २२ आणि २४ कॅरेटचे आजचे दर किती ?
img
वैष्णवी सांगळे
आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोनं-चांदीच्या दराबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. सोनं-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे आज सोन्यासोबत चांदी खरेदी करताना खिशाला कात्री लागणार आहे. 

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, सोन्याच्या दराने मोठा उच्चांक गाठला आहे. १ तोळा सोन्याचे दर १,३७,४०० रुपयांवर पोहचले आहेत. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात १५८० रुपयांनी वाढ झाली आहे. २४ कॅरेटचे एक तोळा सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १,३७,४०० रुपये खर्च करावे लागणार आहेत. तर २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरात तब्बल १५,८०० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १३,७४,००० रुपये खर्च करावे लागणार आहेत.

तर २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १४५० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १,२५,९५० रुपये खर्च करावे लागणार आहे. तर २२ कॅरेटचे १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १४,५०० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १२,५९,५०० रुपये खर्च करावे लागणार आहेत.

१८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे. आज १८ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात ११८० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १,०३,०५० रुपये खर्च करावे लागतील. तर आज १८ कॅरेटचे १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ११,८०० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १०,३०,५०० रुपये खर्च करावे लागणार आहेत. आज सोनं खरेदी करताना तुमच्या खिशावर ताण येणार हे निश्चित आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group