२०२५ चा शेवट गोड ! सोनं आणि चांदीचे दर घसरले
२०२५ चा शेवट गोड ! सोनं आणि चांदीचे दर घसरले
img
वैष्णवी सांगळे
२०२५ वर्षाच्या शेवटच्या दिवशी सोनं-चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.  मागील आठवड्यात सोन्याच्या दराने उच्चांक गाठला होता. आता सोन्याचे दर पुन्हा एकदा घसरत असल्याची नोंद करण्यात आली आहे.

देशभरात सराफा बाजारात सोनं आणि चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली. सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचे दर १३६०३० रुपए प्रति तोळा इतका आहे. २४ तासात सोन्याच्या दरामध्ये ३२० रूपयांची घसरण नोंदवण्यात आली आहे. MCX वर चांदीचा भाव प्रति किलो २४०,४५० इतका आहे. 

कोणत्या शहरात सोन्याची किंमत ?

नाशिक, पुणे, मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १३५,८८० रुपये आहे. २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १२४,५५० रुपये आहे.

राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा १३६,०३० रुपये तर २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा १२४,७०० रुपये आहे.

जयपूरमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १३६,०३० रुपये आहे आणि २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १२४,७०० रुपये आहे.

लखनौमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १३६,०३० रुपये आहे. २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १२४,७०० रुपये आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group