सोन्याच्या दरात आज पुन्हा घसरण...!  24 आणि 22 कॅरेटचे  आजचे  भाव जाणून घ्या
सोन्याच्या दरात आज पुन्हा घसरण...! 24 आणि 22 कॅरेटचे आजचे भाव जाणून घ्या
img
Dipali Ghadwaje
सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याचे पाहायला मिळाले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात वाढ होत असली तरी भारतीय वायदे बाजारत आज सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे चिन्हे आहेत.

MCX वर सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास सोनं 88 रुपयांनी घसरून 71,651 वर स्थिर झाले आहे. तर, मंगळवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 71,739 इतकी होती. चांदीच्या दरातही 180 रुपयांची घट झाली आहे. आज चांदी 88,900 रुपयांवर स्थिर आहे.  

मागील सत्रात रुपयाची 83.57$वर नोंद झाली होती. मात्र, आता यात रिबाउंड आलं आहे. आज रुपया 83.38/$ वर व्यवहार करत आहे. रुपया मजबूत झाल्यानंतर आज बुलियन्स मार्केटमध्ये तेजी आली आहे. सोन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात वाढ झाली आहे. अमेरिकेत मौल्यवान धातुच्या खरेदीत वाढ झाली आहे. फेडरल रिझर्व्ह बँक या वर्षी व्याज दरात कपात करणार आहे. स्पॉट गोल्ड 0.4 टक्क्यांनी वाढून 2,329 डॉलर प्रति औंसवर नोंद झाली आहे. तर, यूएस गोल्ड फ्युचर्स 0.8 टक्क्यांनी वाढून 2,346 डॉलरवर स्थिर झाला आहे. 
 
 आज 24 कॅरेट सोन्याचा दर

1 ग्रॅम- 7,128
8 ग्रॅम- 57,024
10 ग्रॅम-71,280

आज 22 कॅरेट सोन्याचा दर

1 ग्रॅम- 6,530
8 ग्रॅम- 52,240
10 ग्रॅम-65,300

इतर बातम्या
Join Whatsapp Group