ऐन सणासुदीत सोनं-चांदीच्या दरात मोठी वाढ!  जाणून घ्या आजचे दर
ऐन सणासुदीत सोनं-चांदीच्या दरात मोठी वाढ! जाणून घ्या आजचे दर
img
Dipali Ghadwaje
ऐन सणासुदीच्या दिवसांत सोन्याच्या दराने उच्चांक गाठल्यामुळं ग्राहकांच्या चेहऱ्यावरील हसू गायब झाले आहे. सोनं-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सराफा बाजारात आज सोन्याची किंमत 77,800 रुपये प्रतितोळावर स्थिरावली आहे. तर, चांदीदेखील 93,000 हजारांवर पोहोचली आहे.  

गेल्या आठवड्यापासून सोन्याचे भाव अधिकच वाढू लागले आहेत. अमेरिकन बँकांचे कमी झालेले व्याजदर आणि सोन्या चांदीला वाढलेली प्रचंड मागणी तसेच सोन्या चांदीची वाढलेली मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक याचा परिणाम हा सोन्याच्या दारावर होत असल्याची माहिती सुवर्ण व्यवसायिकांनी दिली आहे.  तसंच, सीमा शुल्कात घट केल्यानंतर सोन्याच्या मागणीत वाढ झाली होती.

सणा-सुदीचे दिवस असल्यानेही मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी केलं जात आहे. दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोन्याच्या मागणीत आणखी वाढ होणार आहे. 

पुढच्याच महिन्यात नवरात्री व दिवाळी-दसरा हे सण आहेत. या सणासुदीच्या काळात सोनं मोठ्या प्रमाणात खरेदी केलं जातं. भारतीय संस्कृतीनुसार सोन्याचा संबंध पुराणाशीही जोडला जातो. त्यामुळं दसरा व धनत्रयोदशीला सोनं खरेदी करण्याची परंपरा आहे. याच पार्श्वभूमीवर येत्या काळात सोनं आणखी महाग होण्याची शक्यता आहे. 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group