उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे नव्याने बांधलेल्या भव्य राम मंदिराचे उद्घाटन आणि राम लल्लाच्या सोहळ्याचा कार्यक्रम एका शुभ मुहूर्तावर पूर्ण झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुभ मुहूर्तानुसार मंदिराच्या गर्भगृहात प्रभू रामलल्लाचा अभिषेक केला.
आज अयोध्या राम मंदिराच्या सोहळ्या दिवशी सोन्याचा भाव 63 हजार रुपयांच्या वर आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,200 रुपयांच्या वर आहे. चेन्नईत सोन्याचा भाव 63,550 रुपये आहे. चांदीचा भाव 75,500 रुपये आहे. जाणून घ्या देशातील शहरांमधील सोन्याचे भाव.
मुंबईत आजचा सोन्याचा भाव
मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव 57,800 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 24 कॅरेटसाठी ग्राहकांना 63,050 रुपये प्रति 10 ग्रॅमसाठी मोजावे लागतील.
चेन्नईत आजचा सोन्याचा भाव
चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 58,250 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तामिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,550 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या
कोलकत्ता - 63,050 रुपये
हैदराबाद - 63,050 रुपये
मुंबई - 63,050 रुपये
पुणे - 63,050 रुपये
पटना - 62,770 रुपये
नाशिक - 63, 050
22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?
24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.