सोने-चांदीच्या किंमती गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे सोने खरेदी करावं की नाही असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे. ऐन लग्नसराई आणि सणांच्या दिवसांमध्ये सोन्याच्या किंमती महागल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसत आहे. मात्र सोने खरेदीदारांसाठी एक चांगली बातमी आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावात सातत्याने वाढत होत आहेत. सोन्याचे भाव दोन दिवसांपूर्वी १ लाखांपेक्षा जास्त झाले होते. आज सोन्याच्या भाव कमी झाले आहे. सोन्याचे भाव जवळपास ३००० रुपयांनी घसरले आहेत. त्यामुळे खरेदीदारांसाठी सोने खरेदी करण्याची ही उत्तम संधी आहे.
गुडरिटर्न्सनुसार, आज २४ कॅरेट सोन्याच्या किंमतीत ३००० रुपयांनी घट झाली आहे. २२ कॅरेट सोन्याच्या किंमत २७५० रुपयांनी कमी झाल्या आहेत.१८ कॅरेट सोन्याच्या किंमतीत २२५० रुपयांनी घट झाली आहे.
आजचे सोन्याचे भाव
आज २४ कॅरेट सोन्याची किंमत ९८३५० रुपये आहे. ही किंमत १ तोळ्यासाठी आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत ७८,६६० रुपये आहे. सोन्याच्या ८ ग्रॅमच्या किंमतीत २४०० रुपयांनी घसरण झाली आहे.
आज २२ कॅरेट सोने प्रतितोळा ९०,१५० रुपयांना विकले जात आहे. ८ ग्रॅम सोने ७२,१२० रुपयांना विकले जात आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत २२०० रुपयांनी कमी झाली आहे.
१८ कॅरेट सोन्याची किंमत प्रतितोळा ७३,७६० रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्यासाठी तुम्हाला ५९,००८ रुपये मोजावे लागणार आहे.