सणासुदीच्या काळात भारतात मोठ्या प्रमाणात सोने खरेदी होत असते. तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जरा थांबा... कारण, गणेशोत्सवात सोने आणि चांदी या दोन्ही धातूने या महिन्यात चांगलीच आघाडी घेतली. सोन्याने पुन्हा एकदा उच्चांक गाठला आहे. अशावेळी आजचे भाव कितीने वाढले सविस्तर जाणून घेऊया

काल (13 सप्टेंबर) चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. काल एकाच दिवसात बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील प्रसिद्ध चांदीच्या बाजारपेठेत चांदीच्या दरात तब्बल 4400 रुपयांची वाढ झाल्याचे दिसून आलं आहे.
अमेरिकेतील अर्थव्यवस्थेचा परिणाम म्हणून काल चांदीच्या दरात एकाच दिवसात 4400 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळं सध्या चांदीचा दर हा 87 हजार रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. तर सोन्याच्या भावातही 1 हजार रुपयांची वाढ झाली असून सोने 74 हजार 920 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी दरवाढ झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चढ-उतार सुरू असलेल्या सोन्या-चांदीच्या भावात आज मोठी वाढ झाल्याचे दिसून आली आहे.
नाशिक
10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 68,680 रूपये आहे.
10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 74,920 रूपये आहे.
10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 56,200 रूपये आहे.