ही संधी चांगली आहे! सोन्याचे दर घसरले, तर चांदीच्या दरात.....
ही संधी चांगली आहे! सोन्याचे दर घसरले, तर चांदीच्या दरात.....
img
Dipali Ghadwaje
मुंबई : सोन्याचे दर काही दिवसांपासून वाढत असल्याचं पाहायला मिळतं होतं. स्थानिक सर्राफा बाजारात सोन्याचे दर 80 हजारांच्या जवळ जाताना पाहायला मिळत आहे. दुसरीकडे आज कमोडिटी बाजारात सोन्याचे दर कमी झाल्याचं पाहायला मिळालं. गुंतवणूक म्हणून या पर्यायाच विचार करण्याची गुंतवणूकदारांना संधी आहे. 

MCX वर सोने कितीवर ?

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव 10 ग्रॅमला 78,875 रुपये होता. म्हणजेच कालच्या तुलनेत सोने दरात 127 रुपयांची घसरण झाली. सोन्याचा हा दर फेब्रुवारी कॉन्ट्रॅक्टसाठी पाहायला मिळाला.

आज सोन्याचा किमान दर 78,755 रुपयांपर्यंत घसरला होता. स्थानिक बाजारात 10 ग्रॅम सोनं 79,620 रुपयांच्या दरानं विकलं जात आहे. कमोडिटी मार्केटमध्ये स्वस्तात सोने खरेदीची संधी उपलब्ध आहे. 

MCX वर चांदीचा दर किती? 

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर चांदीचा आजचा दर 96,000 रुपयांच्या जवळ पोहोचला होता. चांदीचा एक किलोचा दर 95,930 रुपये पाहायला मिळाला. चांदीच्या दरात 128 रुपयांची वाढ झाली. चांदीची आजची किमान किंमत 95,625 रुपये होती. 
 

इतर बातम्या
Join Whatsapp Group