ग्राहकांच्या काळजाचा ठोका चुकला ; बजेटच्या आधीच सोन्याच्या किमतीत विक्रमी वाढ , पाहा काय झाला भाव?
ग्राहकांच्या काळजाचा ठोका चुकला ; बजेटच्या आधीच सोन्याच्या किमतीत विक्रमी वाढ , पाहा काय झाला भाव?
img
Dipali Ghadwaje
या आठवड्यात देखील सोन्याचे भाव वाढत असल्याचं दिसून येतंय. सुरुवातीच्या दोन दिवसांना मात्र सोनं स्वस्त झालं होतं. मात्र बुधवारपासून पुन्हा एकदा सोन्याच्या किमतीत वाढ पहायला मिळाली. आज म्हणजे शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे भाव वाढले आहे. उद्या बजेट सादर होणार असून सोन्याच्या किमतींवर कसा परिणाम होणार हा प्रश्न सर्वांसमोर आहे. अशातच आजही सोनं महागल्याने ग्राहक मात्र चिंतेत आहेत.

Goodreturns वेबसाईटनुसार, शुक्रवारी म्हणजेच आज  ३१ जानेवारी रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 1,310 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 8,44,800 रूपये इतकी आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय? 

२२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 7,745 रुपयांना विकलं जात आहे. २२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 61,960 रुपयांवर आहे. १० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 77,450 रुपये इतका आहे. तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 7,74,500 रुपये इतका आहे. 

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

 २४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 8,44,800 रुपये किंमतीने विकलं जातंय. १० ग्रॅम सोन्याचा भाव आज 84,480 रुपये इतका आहे. ८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 67,584 रुपये इतका आहे. १ ग्रॅम सोनं 8,448 रुपयांनी विकलं जात आहे.

नाशिक : 

22 कॅरेट सोनं - 7,733 रुपये 24 कॅरेट सोनं - 8,436 रुपये
इतर बातम्या
Join Whatsapp Group