महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोनं महागलं ; सोन्याचे आजचे दर किती ?
महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोनं महागलं ; सोन्याचे आजचे दर किती ?
img
वैष्णवी सांगळे
सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेत. सोन्यांच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत आहे. अशातच आज १ डिसेंबर २०२५ रोजी, सोमवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात मोठा फेरबदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. सोन्याच्या दरात वाढ झाली आहे तर चांदीच्या दरातही बदल झाल्याचं पाहायला मिळालं आहे. 

आज डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर वाढले आहेत. डिसेंबर महिन्यात अनेक लग्नाचे मूहूर्त आहेत. त्यामुळे सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होईल. अशातच महिन्याच्या सुरुवातीला सोन्याचे दर वाढल्याने सर्वसामान्यांच्या मनात चिंता निर्माण झाली आहे. सोन्याचे दर आज १,३०,४८० रुपये प्रति तोळा आहेत. भविष्यात हे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

सोन्याचे आजचे दर 
आज २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ६६० रुपयांनी वाढले आहे. हे दर १,३०,४८० झाले आहेत. २२ कॅरेटचे दर तोळ्यामागे ६०० रुपयांनी वाढले असून १,१९,६०० रुपयांवर विकले जात आहेत. १८ कॅरेटचे दर ४९० रुपयांनी वाढले आहेत. हे दर ९७,८६० रुपये आहेत.

आज ८ ग्रॅम सोन्याचे दर ५२८ रुपयांनी वाढले आहेत. हे दर १,०४,३८४ रुपये झाले आहे. २२ कॅरेट ८ ग्रॅम सोन्याचे दर ४८० रुपयांनी वाढले असून ९,६८० रुपयांवर विकले जात आहेत.१८ कॅरेटचे दर ८ ग्रॅममागे ३९२ रुपयांनी वाढले असून ७८,२८८ झाले आहेत.

भविष्यात सोन्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु सोने खरेदीसाठीचे सध्याचे दरदेखील सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नाहीयेत. त्यामुळे सोनं घ्यायचं की नाही असा प्रश्न पडलेला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group