सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेत. सोन्यांच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत आहे. अशातच आज २६ डिसेंबर २०२५ रोजी, शुक्रवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात मोठा फेरबदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. सोन्याच्या दरात वाढ झाली आहे तर चांदीच्या दरातही बदल झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
आजचे सोन्याचे दर
२४ कॅरेटचे दर - आज १ तोळा सोन्यामागे ७७० रुपयांनी वाढ झाली आहे. सोन्याचे दर १,४०,०२० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ६१६ रुपयांनी वाढले असून हे दर १,१२,०१६ रुपये झाले आहेत. १० तोळा सोन्याचे दर ७,७०० रुपयांनी वाढले असून १४,००,२०० रुपये आहेत.
२२ कॅरेटचे दर - आज २२ कॅरेटचे दर प्रति तोळ्यामागे ७०० रुपयांनी वाढले आहेत हे दर १,२८,३५० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ५६० रुपयांनी वाढले असून १,०२,६८० रुपये झाले आहेत. १० तोळा सोन्याचे दर ७००० रुपयांनी वाढले असून हे दर १२,८३,५०० रुपये झाले आहेत.
१८ कॅरेटचे दर - १८ कॅरेटचे दर प्रति तोळ्यामागे ५८० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १,०५,०२० रुपये आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ४६४ रुपयांनी वाढले आहे. हे दर ८४,०१६ रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे हे दर ५,८०० रुपयांनी वाढले असून हे दर १०,५०,२०० रुपये झाले आहेत.