खुशखबर! सोन्याचे दर घसरले , काय आहे आजचा भाव
खुशखबर! सोन्याचे दर घसरले , काय आहे आजचा भाव
img
Nandini khandare More

इराण अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचे भाव चांगलेच वाढत होते. मात्र आज सराफ बाजारात उलटफेर झाल्याचे दिसतेय. रोज एक नवीन उचांकी घालणाऱ्या सोन्याचे भाव आज मात्र कमी झाले आहेत. 

आज सोन्याचे भाव घसरले आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोने आणि चांदीचे भाव वाढत असल्यामुळे देशवासींनी वर्षभर खरेदी करु नये असे आवाहन केले होते. मात्र, आज सोन्याचे भाव घसरल्यानंतर खरेदी करावे की नाही असा प्रश्न अनेकांना पडला आहे. जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात 1 हजार 200 रूपयांची तर चांदीच्या दरात 2 हजार रुपयांची घसरण झाली आहे.

आज 10 ग्रॅम सोन्यासाठी जीएसटीसह 1 लाख 59 हजार 444 रुपये मोजावे लागणार आहेत. तर एक किलो चांदीसाठी जीएसटीसह 2 लाख 72 हजार 950 रुपये द्यावे लागणार आहेत.अमेरिका विधान यांच्यातील युद्ध विरामच्या चर्चेला विलंब होत असल्या कारणाने त्याचा परिणाम पुन्हा सोन्या-चांदीच्या दरावर होत असल्याची सराफ व्यावसायिक यांची माहिती.

इतर बातम्या
नाशिकमध्ये उद्या

Join Whatsapp Group