अबब ... सोन्याचा भाव गगनाला !  10 ग्रॅमचा भाव थेट ''इतका''
अबब ... सोन्याचा भाव गगनाला ! 10 ग्रॅमचा भाव थेट ''इतका''
img
Nandini khandare More

गेल्या काही दिवसांमध्ये सोने चांदीच्या भावात चढ उतार होताना दिसत आहे. दार दिवशी सोने चांदीच्या दराचा नवा उचांक गाठलेला दिसतोय दरम्यान आता आज पुन्हा एकदा सोन्याचे भाव गगनाला भिडले असून आजचा आकडा हा अवाक करणारा आहे. 

सोने आणि चांदीच्या भावात आता पुन्हा एकदा वाढ होत आहे. सोन्याचा भाव वाढताना दिसत आहे. जागतिक पातळीवर सोन्याचा भाव वाढल्याने आता सोमवारी सराफा बाजारात सोन्याचा भाव चांगलाच वाढलेला पाहायला मिळाले. 

सोन्याचा भाव 25 मे रोजी थेट 1.60 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला. चांदीचा भावही 2.77 लाख रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. जागतिक बाजारात सकारात्मक संकेत मिळाल्याने सोन्याचा भाव वाढला आहे.

सोमवारी सोन्याचा भाव प्रत्येक 10 ग्रॅममागे 700 पेक्षा जास्त रुपयांनी वाढला आहे. या भाववाढीनंत 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 146,713  रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचला आहे. तर  24 कॅरेट सोन्याचा भाव 160,050  रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत वाढला आहे. 

चांदीचा भावही किलोमागे 4610 रुपयांनी वाढून थेट 276,900 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. दरम्यान सोन्याचा भाव वाढल्यने सामान्यांच्या खिशाला झळ बसत आहे. आगामी काळातही सोन्यचा भाव असाच वाढणार का? असे विचारले जात आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group