आता पटापट खरेदी करा ! १ तोळा  सोने ''इतक्या'' रुपयांनी स्वस्त; वाचा आजचे ताजे दर
आता पटापट खरेदी करा ! १ तोळा सोने ''इतक्या'' रुपयांनी स्वस्त; वाचा आजचे ताजे दर
img
Nandini khandare More
 सराफा बाजारातून खरेदीदारांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या दोन दिवसांत सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे त्यामुळे आता ग्राहकांसाठी सोने खरेदीची सुवर्णसंधी आहे. 

पितृपक्ष सुरू झाल्यानंतर सोने-चांदीच्या खरेदीकडे ग्राहकांकडून काही प्रमाणात पाठ फिरवली जाते. या काळात मौल्यवान धातूंची खरेदी करणे अनेकजण टाळतात. मात्र, याच काळात आता सोन्याचा भावात चांगलीच घसरण झाली आहे. 

आज १ तोळा म्हणजेच १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १,३७० रुपयांनी घसरून १,४८,८०० रुपये इतका झाला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या वाढत्या दरामुळे चिंतेत असलेल्या ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. दरम्यान, १०० ग्रॅम म्हणजेच १० तोळे २४ कॅरेट सोन्याचा दर १४,८८,००० रुपये इतका झाला आहे. विशेषतः नवरात्र, दसरा आणि दिवाळीसारख्या सणांच्या काळात सोन्याची मागणी वाढत असल्याने सध्याच्या दरातील बदल महत्त्वाचा मानला जात आहे. सध्या सोन्याच्या किमतीत झालेली घसरण कायम राहते की पुन्हा दरवाढ होते, याकडे सराफा बाजारासह ग्राहकांचेही लक्ष लागले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group