गुड न्यूज ! सोन्याचे भाव घसरले; आजचे 10 ग्रॅमचे दर किती ?
गुड न्यूज ! सोन्याचे भाव घसरले; आजचे 10 ग्रॅमचे दर किती ?
img
Nandini khandare More


सातत्याने सोन्याच्या भावात चढ उतार सुरु असून आता मात्र सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आजही मोठी खुशखबर आहे. शनिवार , 6 जूनच्या सकाळी सोन्याचे भाव खाली घसरले. आज सकाळी बहुतांश शहरांमध्ये मौल्यवान धातूच्या दरात घसरण झाली. 

मिळालेल्या माहितीनुसार , राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,55, 870 रुपये इथपर्यंत खाली घसरला. मुंबईत हा दर 1, 55,720 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. आदल्याच दिवशी, दिल्लीच्या सराफा बाजारात 99.9 टक्के शुद्ध सोन्याचा भाव 400 रुपयांनी घसरून प्रति 10 ग्रॅम 1,59, 900 रुपयांवर आला होता. सोन्याचे भाव सातत्याने घसरतच असून ग्राहकांसाठी मात्र ही दिलासादायक गोष्ट आहे.

परदेशात सोन्याचे भावही कमकुवत असल्याचे दिसून आले. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डचा भाव प्रति औंस 4,470.79 डॉलर्स इतका आहे. अमेरिका-इराणमधील तणाव काही कमी झालेला नसून दोन्ही देशांमधील शस्त्रसंधी कराराबाबतची अनिश्चितता कायम आहे. पश्चिम आशियातील तणावामुळे प्रमुख व्याजदर दीर्घकाळ वाढलेले राहतील अशी चिंता वाढली आहे. सोने आणि चांदीसारख्या मौल्यवान धातूंसाठी हा एक नकारात्मक घटक आहे.

दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,55,870 रुपये तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,42,890 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर मुंबई आणि कोलकातामध्ये 22 कॅरेटचं सोनं 1,42,740 तर 24 कॅरेट सोनं हे 1,55,720 रुपयांना मिळत आहे. तर चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,57,950आहे. 22-कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,44,290 रुपये आहे. पुणे आणि बंगळुरूत 24 कॅरेट सोन्याचे दर 1,55,720 रुपये आणि 22 कॅरेटची किंमत 1,42,740 प्रति 10 ग्रॅम आहे.

सोन्याप्रमाणेच चांदी या आणखी एका मौल्यवान धातूच्या किमतीतही सातत्याने घट होत आहे. 6 जूनच्या सकाळी चांदीचा भाव 2,74,900 रुपये प्रति किलोग्राम होता. आदल्या दिवशी, दिल्ली सराफा बाजारात चांदीचा भाव 5000 रुपयांनी घसरून 2,60,700 रुपये प्रति किलोग्राम झाला होता. चांदीचा आंतरराष्ट्रीय स्पॉट भाव 72.89 डॉलर प्रति औंस आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group