सोने चांदीच्या दरात बदल ; सोनं स्वस्त झालं की महाग ? आजचे दर काय ?
सोने चांदीच्या दरात बदल ; सोनं स्वस्त झालं की महाग ? आजचे दर काय ?
img
वैष्णवी सांगळे
गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीचे दर कमी जास्त आहेत. सध्या लग्न सराईचे दिवस सुरु आहेत. या दिवसात सोनं-चांदीचा खप सगळ्यात जास्त होत असतो. दरम्यान, गेल्या काही दिवसात सोने-चांदीचे दर कमी होताना पाहायला मिळाले आहे. ही सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्वाची आणि खिशाला परवडणारी बातमी आहे.

सोने-चांदीच्या किमतीत मार्च महिन्यात घसरण होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे सराफा बाजारात पुन्हा एकदा गुंतवणूकदरांचे लक्ष या मौल्यवान धातूंवर केंद्रित झाले आहे. कारण ४ मार्च रोजी २४ कॅरेट सोन्याचा दर हा सुमारे ₹1.62 लाख प्रति 10 ग्रॅम होता. हाच दर आता घसरून ₹1.50 लाखांच्या आसपास आला आहे. म्हणजेच सोन्याच्या दरात सुमारे ₹12 हजारांची घट झाली आहे.

चांदीही लग्नसराईत जास्त खरेदी केली जाते. चांदीचा दर हे ४ मार्चला ₹2.70 लाख प्रति किलो होता. आता यात काही प्रमाणात बदल झाला आहे. आता तो दर ₹2.35 लाखांपर्यंत खाली आला आहे. म्हणजेच चांदीत तब्बल ₹35 हजारांची घसरण झालेली आहे. ही सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

सध्या १ ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव १५,०९३ रुपयांवर आहे;  ८ ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव आता १,२०,७४४ रुपये आहे. तर १० ग्रॅम सोन्याचा दर १,५०,९३० रुपयांवर आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group