सध्याच्या काळात सोन्याची खरेदी करणं मोठं अवघड झालंय. कारण, दिवसेंदिवस सोन्याच्या दरात मोठी वाढ होताना दिसतेय. सध्या सोन्यानं दराची उच्चांकी पातळी गाठली आहे. त्यामुळं खरेदीदारांच्या खिशाला मोठी झळ बसत असल्याचं चित्र दिसत आहे.
दरम्यान, देशाची राजधानी दिल्लीत सोन्यानं दराचे सर्व विक्रम मोडले आहेत. पण देशात दिल्लीपेक्षाही महाग सोनं एका शहरात मिळत आहे.
सध्या देशात सोन्याच्या दरानं विक्रमी पातळी गाठली आहे. सोन्याच्या दरात मोठी वाढ होताना दिसतेय. देशात सर्वात जास्त महाग सोनं हे दिल्लीत मिळत आहे. मात्र, सध्या दिल्लीपेक्षाही 2000 रुपयांनी महाग सोनं एका शहरात मिळत आहे. मध्य प्रदेशातील इंदूर असं या शहराचं नाव आहे. या शहारत सोन्याच्या दरानं सर्व विक्रम मोडले आहेत. देशातील सर्वात महाग सोनं या शहरात मिळत आहे. इंदूरमध्ये सोन्याचे दर हे 76 हजार रुपयांच्या जवळ पोहोचले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, देशातील वायदे बाजारात सध्या सोन्याच दर हे 73 हजार रुपयांच्या आसपास आहेत. तर दुसरीकडे काही शहरात सोन्याचे दर हे विक्रमी पातळी गाठताना दिसत आहेत. राजधानी दिल्लीपेक्षा इंदूरमध्ये सोनं 2000 रुपयांनी महाग आहे. इंदूरमध्ये सध्या सोन्याचा भाव हा 75,700 रुपये आहे, म्हणजे सोनं 76 हजार रुपयांच्या जवळ पोहोचलं आहे.
सध्या एका बाजूला लग्नसराईचा हंगाम सुरु आहे आणि दुसऱ्या बाजूला सोन्याच्या दरात वाढ होतेय. या काळात मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली जाते. मात्र, आता सोनं खरेदी करताना सामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.