दिवाळी अवघ्या ४ दिवसांवर येऊन ठेवपलेली असताना दिवाळीच्या मुहूर्तावर सोने-चांदी खरेदी करणाऱ्यासाठी खूशखबर आहे. आज 8 ऑक्टोबर रोजी, बुधवारी सोने-चांदी स्वस्त झाले आहेत. यामुळे सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. आज सोने आणि चांदीचे दर घसरले आहेत. आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 160 रुपयांची घसरण झाली आहे. दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली असताना, बाजारात ग्राहकांची लगबग पाहायला मिळत आहे. धनत्रयोदशीच्या आधीच सोने आणि चांदी स्वस्त झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीचे दर घटताना दिसत आहेत.
आज मुंबईमध्ये 24 कॅरेट सोनं 160 रुपयांनी स्वस्त झालं आहे. गुडरिटर्न्स वेबसाईट नुसार, मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याचा दर 61,200 रुपये आहे. मंगळवारी हा दर 61,360 रुपये होता. त्यासोबतच 22 कॅरेट सोनं 150 रुपयांनी स्वस्त झालं आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर 56,250 वरून 56,100 रुपयांवर पोहोचला आहे.
चांदीच्या दरातही घसरण
सोन्याप्रमाणेच आज चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. आज चांदीचा दर 1000 रुपयांनी कमी झाला आहे. एक किलो चांदीचा दर 74,500 रुपयांवरून 73,500 रुपयांवर पोहोचला आहे.