सणासुदीचा काळ ! २४ अन् २२ कॅरेट सोन्याची किंमत किती ? वाचा
सणासुदीचा काळ ! २४ अन् २२ कॅरेट सोन्याची किंमत किती ? वाचा
img
वैष्णवी सांगळे
भारतीय संस्कृतीत अतिशय लोकप्रिय असलेलं सोनं हे फक्त दागिन्यांपुरतं मर्यादित नाही तर गुंतवणूक आणि बचतीचा उत्तम मार्ग म्हणूनही त्याकडे पाहिलं जातं. सध्या सणासुदीच्या काळात तर सोनं खरेदीला उधाण येतं. हाच ट्रेंड कायम राखत आजही सोन्या-चांदीच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे.

राज्यात सणासुदीचं वातावरण आहे. घरोघरी गणराया विराजमान झाले आहेत. गौरीचं देखील आगमन झालं आहे. गौरीसाठी बरेच जण सोन्याचे दागिने खरेदी करतात. परंतु गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. 

आज २ सप्टेंबर, २४ कॅरेट १० ग्रॅम सोनं २१० रूपयांनी वाढले आहे. खरेदीसाठी १,०६,०९० रूपये मोजावे लागतील. तर, २४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं २,१०० रूपयांनी महागले आहे. १०० ग्रॅम सोनं खरेदीसाठी १०,६०,९०० मोजावे लागणार आहेत. 

तर २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात २०० रूपयांची वाढ झाली आहे. १ तोळं सोनं खरेदीसाठी ९७,२५० रूपये मोजावे लागतील. तर, २२ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या दरात २००० रूपयांची वाढ झाली आह. २२ कॅरेट १० तोळं सोनं खरेदीसाठी ९,७२,५०० रूपये मोजावे लागणार आहेत. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group