गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दरात चांगलेच चढ उतार पहायला मिळत आहे. सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसला आहे. अशातच आज महिन्याच्या पहिल्याच दिवशी शनिवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात मोठा फेरबदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १२१,६४० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर १११,५०३ रुपये आहे. तर १ किलो चांदीचा दर १४८,८४० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचा दर १,४५४ रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.
आज महाराष्ट्रामध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर हा प्रति १० ग्रॅम १११,३०२ रुपये असा आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा दर हा १२१,४२० प्रति १० ग्रॅम आहे. सोन्याचे दर शहराप्रमाणे आणि मेकिंग चार्जेसप्रमाणे सराफ बाजारात बदलते राहतील.