दसरा सणाच्या तोंडावर ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सोन्याच्या दरात 1600 रुपयांची घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. जागतिक पातळीवर इराण आणि इस्रायल देशातील युद्धाच्या परिस्थितीमुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून गुंतवणूकदारानी आपली गुंतवणूक सोन्याच्याकडे वळविल्याने मागणीत वाढ होऊन सोन्याचे दर हे जीएसटीसह 78000 रुपयांच्यावर पोहोचले होते.
मात्र, गेल्या चोवीस तासात सोन्याच्या दरात 1600 रुपयांची घट झाल्याने सोन्याचे दर 76600 रुपयांच्या खाली असल्याने ऐन दसऱ्याच्या तोंडावर ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असल्याचं पाहायला मिळत आहे.
आज 24 कॅरेट साठी आज प्रति ग्रॅम 7483 मोजावे लागणार आहेत. 22 कॅरेटसाठी आज प्रति ग्रॅम 7303 मोजावे लागणार आहेत तर 18 कॅरेट साठी 6061 रूपये मोजावे लागणार आहेत. हिंदू संस्कृतीमध्ये साडेतीन मुहूर्तापैंकी एक असलेल्या दसरा सणाला सोनं खरेदी शुभं मानलं जात. यामुळे अनेक जण थोड्या फार प्रमाणात सोनं खरेदी करतात. अशातच आता दसरा सणाच्या तोंडावर येऊन ठेपलेला असताना सोन्यात घसरण होत असल्याने अनेक जण खरेदीसाठी गर्दी करण्याची शक्यता आहे.
आज सोन्याचा दर हा प्रति ग्रॅम 7483 रुपयांपर्यंत घसरला आहे. त्याचप्रमाणे शुद्धतेच्या आधारावर सोने आणि चांदी दोन्ही स्वस्त झाले आहेत. सोन्याच्या दरात 1600 रुपयांची घसरण झाली आहे. शनिवारी (12 ऑक्टोबर) दसरा आहे. त्यामुळे या सणाच्या दोन दिवस आधी हे सोन्याचे दर कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.