सध्या लग्नाचे दिवस सुरु असून सर्वांचं लक्ष सोने तसंच चांदीच्या भावाकडे असतं. अशातच आज म्हणजेच मंगळवारी सोन्याच्या भावात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे सोनं खरेदी करण्याऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे.
मनी कंट्रोलच्या बेवसाईटनुसार, मंगळवार 26 नोव्हेंबर रोजी सोन्याच्या किमतीत 10 ग्रॅमची घट पहायला मिळाली आहे. दिल्ली, मुंबई, पटना, जयपूर, लखनऊ या मोठ्या शहरांमध्ये सोने 300 रुपयांनी स्वस्त झाल्याची माहिती आहे.
यावेळी 24 कॅरेट सोन्याचा दर 78,700 रुपयांच्या वर आहे. याचसोबत 22 कॅरेट सोन्याचा दर 72,100 रुपयांच्या वर आहे. सोन्याबाबत तज्ज्ञांचे मत आहे की, भविष्यात सोन्याच्या दरात तेजी येण्याची शक्यता आहे.
आजच्या दिवशी चांदीच्या दरात देखील घट पाहायला मिळालीये. देशात एक किलो चांदीची किंमत 91,500 रुपये आहे. सोमवारच्या तुलनेत चांदीच्या दरात 500 रुपयांनी घट झाली आहे.