सोन्याला पुन्हा झळाळी, सोन्याचा आजचा भाव किती ?
सोन्याला पुन्हा झळाळी, सोन्याचा आजचा भाव किती ?
img
वैष्णवी सांगळे
गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या दरात मोठे चढउतार पहायला मिळत आहे. आज पुन्हा सोन्याच्या दरात वाढ पहायला मिळाली आहे. सोमवारी सोन्याच्या किंमतीत वाढ नोंदवण्यात आली होती, तर मंगळवारी सोन्याच्या किंमतीत कपात दिसून आली होती. तर आज पुन्हा सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात वाढ नोंदवण्यात आली आहे. 
आंतरराष्ट्रीय बाजारात देवणाघेवाण अन् अमेरिकन फेडरल बँकेच्या होणाऱ्या बैठकीमुळे सोन्याच्या दरात चढउतार होत असल्याचा अंदाज वर्तवला जातोय. 

२४ कॅरेट सोन्याचे आजचे दर
१ ग्रॅम सोन्याची किंमत १३,०४६ रुपये आहे. मंगळवारच्या तुलनेत ८७ रुपयांनी महागले.
१० ग्रॅम सोन्याची किंमत १,३०,४६० रुपये नोंदवण्यात आली. ८७० रुपयांनी सोनं महागले.

२२ कॅरेट सोन्याचे दर 
१ ग्रॅम सोन्याची किंमत ११,९६० रुपये नोंदवण्यता आली. ८० रुपयांनी महागले.
१० ग्रॅम सोन्याची किंमत १,१९,६०० रुपये आहे. मंगळवारच्या तुलनेत ८०० रुपयांची वाढ नोंदवण्यात आली.

१८ कॅरेट सोन्याचे आजचे दर 
१ ग्रॅमची सोन्याची किंमत ६५ रूपयांनी वाढून ९,७८८ रुपये झाली.
१० ग्रॅम सोन्याची किंमत ६५० रूपयांनी वाढून ९७,८८० रूपये झाली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group