गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चढ उतार पहायला मिळत आहे. असे असले तरी सोने गगनाला भिडलेलेच आहे. आज सोन्याच्या दरात किती रूपयांची वाढ झाली आहे? जाणून घ्या.
आज ११ नोव्हेंबर २०२५. सोन्याच्या दरानं आज उसळी घेतली आहे.
२४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात २,४६० रूपयांची वाढ झाली आहे. २४ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला १,२६,२८० रूपये मोजावे लागतील. तर, २४ कॅरेट १० तोळं खरेदीसाठी १२,६२,८०० रूपये मोजावे लागतील.
२४ सह २२ कॅरेट सोन्याच्या दरातही वाढ झाली आहे. २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात २,२५० रूपयांची वाढ झाली आहे. २२ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला १,१५,७५० रूपये मोजावे लागतील. तर,२२ कॅरेट १० तोळं सोनं खरेदीसाठी ११,५७,५०० रूपये मोजावे लागतील.
२४ सह २२ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दरातही वाढ झाली आहे. १८ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात १,८४० रूपयांची वाढ झाली आहे. १८ कॅरेट १ तोळं खरेदीसाठी आपल्याला ९४,७१० रूपये मोजावे लागतील. तर, १८ कॅरेट १० तोळं खरेदीसाठी आपल्याला ९,४७,१०० रूपये मोजावे लागतील.