सोन्याच्या किंमती ज्या वेगाने वाढत आहेत तसा वेग यापूर्वी कधीही पहायला मिळाला नव्हता. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सोनं महागलं होतं. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशीही सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत. वाढणारे सोन्याचे दर हे सर्वसामान्यांना न परवडणारे आहे. नवीन वर्षात सोन्याचे दर अजून वाढण्याची शक्यता आहे.
आज २ जानेवारी रोजी सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे १,१४० रुपयांनी वाढले आहेत. हे दर आज १,३६,२०० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोनं ११,४०० रुपयांनी महागलं असून हे दर १३,६२,००० रुपये आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याची किंमत ९१२ रुपयांनी वाढली असून १,०८,९६० रुपये झाली आहे.
आज २२ कॅरेटचे दर प्रति तोळ्यामागे १०५० रुपयांनी वाढले आहे. आज सोनं १ तोळ्यामागे १,२४,८५० रुपयांना विकले जात आहे. १० तोळ्यामागे सोनं १०५०० रुपयांनी महागलं असून हे दर १२,४८,५०० रुपये झाले आहेत.
१८ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ८६० रुपयांनी महागले आहेत. हे दर १,०२,१५० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर ६८८ रुपयांची वाढ झाली आहे हे दर ८१,७२० रुपये आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर ८६०० रुपयांनी वाढले असून हे दर १०,२१,५०० रुपये झाले आहेत.