काय सांगता..! अक्षय्य तृतीयेला सोनं 1 लाखांचा टप्पा ओलांडणार? वाचा सविस्तर
काय सांगता..! अक्षय्य तृतीयेला सोनं 1 लाखांचा टप्पा ओलांडणार? वाचा सविस्तर
img
Dipali Ghadwaje
लग्नसराईच्या सोन्याच्या दरांनी नवा विक्रमी टप्पा गाठला आहे. सोन्यासह चांदीच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. जळगावमधील सराफ बाजारात बुधवारी (१६ एप्रिल) रोजी सोन्याच्या दरात तब्बल १,३०० रुपयांची वाढ झाली असून जीएसटीसह सोन्याचे दर ९५,५०० रुपयांवर पोहोचले आहेत.

जळगावच्या सराफ बाजारच्या इतिहासात पहिल्यांदाच सोन्याच्या दराने ९७ हजारांचा आकडा पार केला आहे. मागील ५ दिवसांपासून सोन्याचे दर सातत्याने वाढत आहे. आतापर्यंत यात एकूण ४ हजार रुपयांची वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे गुंतवणूकदार आणि ग्राहक चिंतेत आहेत. याचा परिणाम सोनेखरेदीवर झाला आहे. 

सोन्यासह चांदीच्या दरात देखील झपाट्याने वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. चांदीचा दर ९९,३९५ रुपये (जीएसटीसह) प्रति किलोवर पोहोचला आहे. चांदी पुन्हा एकदा १ लाख रुपयांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. चांदीची किंमत लवकरच लाखाच्या घरात जाईल असा अंदाज वर्तवला जात आहे.  

सोने-चांदीच्या दरवाढीमागे आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्रॅरिफ संदर्भातील धोरण आणि आर्थिक अनिश्चितता कारणीभूत आहे असे सराफ बाजारीतील व्यापाऱ्यांचे मत आहे.

सोन्याच्या वाढत्या मागणीमुळे आणि त्याच्या दरवाढीमुळे आगामी काळात सोन्याचे दर १ लाख रुपयांवर पोहोचतील असा अंदाज सराफ व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे.  ऐन लग्नसराईच्या काळात ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरवल्याने व्यापाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
gold |
इतर बातम्या
Join Whatsapp Group