सर्वांचं लक्ष लागून असलेल्या सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंचे दर बघता बघता इतके वाढलेत, की सर्व जुने विक्रम एकाच झटक्यात मोडले गेले आहेत. चांदीने तर ४ लाख रुपयांचा टप्पा ओलांडून इतिहास रचला आहे, आणि दुसरीकडे सोन्याची चमकही आता सामान्य खरेदीदाराच्या आवाक्याबाहेर जाताना दिसत आहे. बाजारातील या ऐतिहासिक वाढीमुळे सर्वांनाच विचार करायला भाग पाडले आहे.
२९ जानेवारी रोजी सकाळच्या सत्रात सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी झेप पाहायला मिळाली. आज सोन्याचे दर सुमारे ११,००० रुपये किंवा ६ टक्क्यांनी वधारून १,७८,८५० रुपये प्रति १० ग्रॅम या विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचला. त्याचप्रमाणे, चांदीच्या दरातही वाढ होऊन ती ४,१०,००० रुपये प्रति किलो या ऐतिहासिक स्तरावर पोहोचली आहे.
आज २४ कॅरेट ( १० ग्रॅम )सोन्याचे ₹ दर १,७८,८५० असून या दरात ११,७७० रुपयांची वाढ झाली आहे. तर आज २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचे दर ₹ १,६३,९५० असून १०,८०० रुपयांची वाढ झाली.
चांदीच्या किमतीत देखील झपाट्याने वाढ झाली आहे. एमसीएक्सवर चांदीची किंमत प्रति किलो ४,१०,००० रुपयांवर पोहोचली आहे. मात्र ही वाढ अचानक झालेली नाही. गेल्या मंगळवारी चांदीच्या किमतीत 40 हजार 500 रुपयांची मोठी वाढ झाली. दुसऱ्याच दिवशी, बुधवारी, किमतीत आणखी 15 हजारांची वाढ झाली.