दिवसेंदिवस महागाईची झळ सर्वसामान्यांना बसत आहे. आता आज पुन्हा एकदा सोनं महागल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. सोन्याचे दर १ लाखांच्या पार गेले आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला चांगलाच फटका बसत आहे. पुढच्या महिन्यापासून सणासुदीचे दिवस सुरु होत आहेत. परंतु सध्या सोन्याचे दर गगनाला भिडल्याने सोने खरेदी करावी की नाही, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. दरम्यान आज सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे १,०४० रुपयांनी वाढ झाली आहे.
२४ कॅरेट सोन्याचे दर - आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात १०४० रुपयांनी वाढ झाली आहे. आज सोन्याचे दर १,०२,३३० रुपये आहेत. १० तोळा सोन्याचे दर १०,२३,३०० रुपये झाले आहेत. या दरात १०,४०० रुपयांनी वाढ झाली आहे.
२२ कॅरेट सोन्याचे दर - २२ कॅरेट सोन्याचे दर ९५० रुपयांनी वाढले आहे. १ तोळा सोन्याचे दर ९३,८०० रुपये झाले आहेत. १० तोळा सोन्याचे दर ९,३८,००० रुपये आहेत
१८ कॅरेट सोन्याचे दर - आज १८ कॅरेट सोन्याचे दर ७६,७५० रुपये प्रति तोळा आहेत. हे दर ७८० रुपयांनी वाढले आहेत. १० तोळा सोन्याचे दर ७,६७,५०० रुपये आहेत. या दरात ७,८०० रुपयांनी वाढ झाली आहे.