बॉलिवूडच्या 'या' प्रसिद्ध गायकाचा भीषण कार अपघात, व्हिडीओ व्हायरल
बॉलिवूडच्या 'या' प्रसिद्ध गायकाचा भीषण कार अपघात, व्हिडीओ व्हायरल
img
वैष्णवी सांगळे
गायनसृष्टीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध गायकाचा भीषण कार अपघात झाला. स्टंट करताना चूक झाली आणि त्यानंतर हा अपघात घडल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे. हिप-हॉपचा किंग समजला जाणारा एमीवे बंटाई सध्या त्याच्या 'दुबई कंपनी'  या नव्या म्युझिक व्हिडीओच्या शुटिंगसाठी दुबईतील शारजाह इथे आहे. या शूटिंग दरम्यान त्यांचा गंभीर अपघात झाला आहे. 

एमीवे बंटाईनं त्याच्या यूट्यूब चॅनलवर एका व्हीलॉगचा टीझर शेअर केला आहे, ज्यामध्ये तो स्टंट करताना दिसतोय, पण स्टंट करत असताना त्याचा अपघात होतो. व्हिडीओमध्ये एमीवे पडताना दिसतोय. व्हिडीओमध्ये दिसतंय की एमीवे चालत्या कारच्या खिडकीवर बसलेला आहे. त्याचवेळी कार अचानक जागेवर थांबते आणि बेसावध असलेला एमीवे बंटाई तोल गमावून चालत्या कारमधून बाहेर तोंडावर आपटतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. 

धक्कादायक ! श्वसननलिका कापली; रक्तवाहिन्या तुटेपर्यंत मारलं; महादेव मुंडेंची संतोष देशमुखांपेक्षा भयंकर हत्या

दरम्यान, हा अपघात जाणूनबुजून केलेला स्टंट होता की, चूक हे अजून स्पष्ट झालेलं नाही. इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओसोबत एमीवेनं लिहिलंय की, "स्टंट करताना चूक झाली....". रॅपरच्या या पोस्टनंतर त्याचे चाहते त्याची काळजी करत आहे. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group