प्रसिद्ध रॅपरचे निधन, वयाच्या २६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
प्रसिद्ध रॅपरचे निधन, वयाच्या २६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
img
वैष्णवी सांगळे
हिप-हॉप, पंक रॉक आणि मेटलच्या अनोख्या स्टाईलसाठी जगभरात प्रसिद्ध रॅपर पूअरस्टेसीचे निधन झाले आहे. वयाच्या २६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पूरस्टेसीच्या मृत्यूचे कारण अद्याप कळलेले नाही. पाम बीचचा रहिवासी असलेल्या पूअरस्टेसीने दोन स्टुडिओ अल्बम आणि दोन ईपी रिलीज केले होते. 

त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. त्याने आणि बार्करने "चूज लाईफ", "नथिंग लेफ्ट" आणि "हिल्स हॅव आयज" यासह अनेक गाणी गायली आहेत. पूअरस्टेसीने गायक-रॅपर इयान डायरसोबत देखील काम केले आणि ग्रॅमी नॉमिनेटेड "बिल अँड टेड फेस द म्युझिक" साउंडट्रॅकसाठी तो दिसला.

पेज सिक्सच्या अहवालानुसार, पाम बीच काउंटी मेडिकल एक्झामिनरने संगीतकाराच्या मृत्यूची पुष्टी केली. बोका रॅटन पोलिस विभागाने पुष्टी केली की फ्लोरिडामध्ये जन्मलेल्या रॅपर पूअरस्टेसीचे निधन एका "घटनेनंतर" झाले. पूरस्टेसीच्या निधनाच्या बातमीनंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केल्या आहेत
rapper |
इतर बातम्या
Join Whatsapp Group