लग्नसराईचे दिवस सुरू होताच सोन्याचे दर कोसळल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या आठवड्यात सोन्याचे दर हे खाली आल्याचे दिसून येत आहे.
आज 14 नोव्हेंबररोजी देखील सोन्यात मोठी घसरण झाली आहे. सोन्याचे दर दिवाळीपेक्षा आता उतरणीला लागले आहेत. तुळशीच्या लग्नानंतर लग्नसराईला सुरुवात होते. या काळात सोने मोठ्या प्रमाणात खरेदी केले जाते. सराफा बाजारात सध्या वर-वधुची दागिने खरेदीसाठी लगबग दिसून येत आहे. आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात प्रतितोळा 1,200 रुपयांची घट झाली आहे. त्यामुळं सोनं आज 75,650 रुपयांवर पोहोचले आहे.
तर, आज 22 कॅरेट सोन्याच्या दरात 1,100 रुपयांची घट झाली असून प्रतितोळा सोनं 69,350 रुपयांवर पोहोचलं आहे. तर, 24 कॅरेट सोन्याच्या दरात 1,200 रुपयांची घट झाली असून प्रतितोळा सोनं 75,650 रुपयांवर पोहोचलं आहे. तसेच, 18 कॅरेट सोन्याच्या दरात 900 रुपयांची घट झाली असून सोनं 56,740 रुपयांवर पोहोचलं आहे.
कॅरेटनुसार जाणून घ्या सोन्याचे भाव
10 ग्रॅम सोन्यासाठी 22 कॅरेटची किंमत 69,350 रुपये आहे. 10 ग्रॅम सोन्यासाठी 24 कॅरेटची किंमत 75,650 रुपये आहे. 10 ग्रॅम सोन्यासाठी 18 कॅरेटची किंमत 57,740 रुपये आहे.
1 ग्रॅम सोन्यासाठी 22 कॅरेटची किंमत 6,935 रुपये आहे. 1 ग्रॅम सोन्यासाठी 24 कॅरेटची किंमत 7, 565 रुपये आहे. 1 ग्रॅम सोन्यासाठी 18 कॅरेटची किंमत 5, 674 रुपये आहे.
8 ग्रॅम सोन्यासाठी 22 कॅरेटची किंमत 55,480 रुपये आहे. 8 ग्रॅम सोन्यासाठी 24 कॅरेटची किंमत 60,520 रुपये आहे. 8 ग्रॅम सोन्यासाठी 18 कॅरेटची किंमत 45,392 रुपये आहे.