भारत सरकारने नागरिकांच्या हितासाठी अनेक योजना राबवल्या आहेत. त्यातील अनेक योजनांमधून नागरिकांना आर्थिक मदत केली जाते. सरकारने देशातील गरीब लोकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी सरकारने एक योजना राबवली आहे.
'पीएम श्रम योगी मानधन योजना' असं या योजनेच नाव आहे. ज्या कामगारांचे दर महिन्याना निश्चित उत्पन्न नसते. त्या लोकांना सरकार आर्थिक मदत करते. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना दर महिन्याला ३००० रुपयांची पेन्शन दिले जाते. सर्व क्षेत्रातील मजूर या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
भारत सरकारने २०१९ मध्ये पीएम श्रमयोगी मानधन योजना सुरु केली होती. या योजनेत मजुरांना ६० वर्षानंतर ३००० रुपयांची मासिक पेन्शन दिली जाते. या योजनेत जेवढे पैसे मजुरांकडून दिले जातात. तेवढेच पैसे सरकार देखील जमा करते. या योजनेत जर कामगारांनी १०० रुपयांची गुंतवणूक केली तर सरकारदेखील १०० रुपयांची गुंतवणूक केली जाते. या योजनेत १८ ते ४० वयोगटातील मजुर अर्ज करु शकतात. या योजनेत कमीत कमी २० वर्षांपर्यंत पैसे द्यावे लागतात.
त्यानंतरच ६० वर्षानंतर तुम्हाला ३००० रुपयांची पेन्शन दिली जाते. पीएम श्रम योगी मानधन योजनेत असंगठित क्षेत्रात काम करणारे कामगार अर्ज करु शकतात. रिक्षा चालक, घर बांधकाम करणारे मजूर, ड्रायव्हर, प्लंबर, दुकानदार, मील वर्कर,कृषी कामगार, धोबी अशा विविध क्षेत्रात काम करणारे कामगार या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
पीएम श्रम योगी मानधन योजनेत अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जावे लागेल. त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड आणि बँक डिटेल्स देऊन रजिस्टर करावे लागेल. यामध्ये बँक अकाउंट आणि फोन नंबर लिंक असावा. या योजनेत तुमचे पैसे तुमच्या अकाउंटमधून डायरेक्ट ऑटो डेबिट होतात. पहिले काँट्रेब्युशन तुम्हाला रोख द्यावे लागणार आहे. त्यानंतर प्रत्येक महिन्याला तुमचे पैसे कापले जातात.