केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आठव्या वेतन आयोगाअंतर्गत आता कर्मचाऱ्यांच्या पगारत मोठी वाढ होणार आहे. आठवा वेतन आयोग लागू होण्याची घोषणा करण्यात आली आहे.
मात्र, अद्याप हा वेतन आयोग लागू करण्याबाबत कोणतीही प्रक्रिया सुरु झालेली नाही. परंतु हा वेतन आयोग १ जानेवारी २०२६ पासून लागू होऊ शकतो.
आठवा वेतन आयोग लागू झाल्यावर लाखो कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना फायदा होणार आहे. त्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे.या वेतन आयोगाअंतर्गत वाढीव पगार १ जानेवारी २०२६ च्या पगारात यायला हवा. मात्र, या प्रक्रियेला अजून वेळ लागण्याची शक्यता आहे.
पगार कितीने वाढणार?
आठव्या वेतन आयोगाअंतर्गत फिटमेंट फॅक्टर २.२८ ते २.८६ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात ४० ते ५० टक्क्यांनी वाढ होऊ शकते. जर फिटमेंट फॅक्टर २.८६ झाला तर कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी ही ५७,२०० रुपये होऊ शकते. मिडिया रिपोर्टनुसार, आठव्या वेतन आयोगाअंतर्गत फिटमेंट फॅक्टर जेवढे वाढेल त्यावर तुमचा पगार किती वाढणार हे ठरणार आहे.
फिटमेंट फॅक्टर काय आहे?
फिटमेंट फॅक्टरच्या आधारावर पगारवाढ ठरवली जाते. दर दहा वर्षांनी फिटमेंट फॅक्टर बदलला जातो. जर फिटमेंट फॅक्टर २.५७ असेल तर कर्मचाऱ्यांच्या पगारात ७,००० ते १८,००० रुपयांनी वाढ होणार आहे. पगारासोबतच कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यातदेखील वाढ होणार आहे.