महत्वाची बातमी : आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट! कर्मचाऱ्यांच्या पगारात
महत्वाची बातमी : आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट! कर्मचाऱ्यांच्या पगारात "इतक्या" टक्क्यांनी होणार वाढ
img
Dipali Ghadwaje
केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला परवानगी दिली आहे. त्यामुळे १ जानेवारी २०२६ पासून लागू होणाऱ्या आठव्या केंद्रीय वेतन आयोगानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगार, निवृत्तीवेतन आणि भत्त्यांमध्ये वाढ होणार आहे. याचा सुमारे एक कोटीहून अधिक केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.   

केंद्र सरकार लवकरच आठवा वेतन आयोग लागू करणार आहे. आठवा वेतन आयोग लागू झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांना खूप फायदा होणार आहे. आठव्या वेतन आयोगात समिती स्थापन करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. २०२६ मध्ये केंद्रिय कर्मचारी आठवा वेतन आयोग लागू करेन. ८ व्या वेतन आयोगात १० ते ३० टक्के पगार वाढू शकतो.  

एका वृत्त संस्थेने दिलेल्या वृत्तानुसार  , ८ व्या वेतन आयोगाच्या फिटमेंट फॅक्टरचा निर्णय १ जानेवारी २०२६ रोजी लागू होणाऱ्या महागाई भत्ता आणि मूळ वेतनाच्या आधारे घेतला जाईल. मूळ वेतन हे फिटमेंट फॅक्टरच्या आधारे ठरवले जाते. यामुळेच सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन मिळते.

७ व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर २.५७ ठेवण्यात आला होता. सातव्या वेतन आयोगात बेसिक सॅलरी ही ७००० रुपयांवरुन १८००० रुपये करण्यात आली होती. दरम्यान, ८ व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर २.८६ होण्याची शक्यता आहे.

यामुळे कर्मचाऱ्यांचे बेसिक वेतन ५१,४८० होऊ शकते. असं झालं तर सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन १८६ टक्के वाढेल. परंतु अनेक तज्ञांच्या मते, पगार हा १० ते ३० टक्क्यांनी वाढू शकतो.

महागाई भत्त्यात वाढ आठवा वेतन आयोग लागू झाल्यास महागाई भत्त्यातदेखील वाढ होणार आहे. दरम्यान, २०२५ मध्ये महागाई भत्ता हा दोनदा वाढणार आहे. १ जानेवारी २०२५ आणि १ जुलै २०२५ पासून महागाई भत्ता वाढणार आहे.अद्याप १ जानेवारीच्या महागाई भत्त्याबद्दल कोणतीही घोषणा केली गेली नाही. परंतु महागाई भत्त्या हा या तारखेपासून लागू होणार आहे. २०२५ मध्ये महागाई भत्ता ७ टक्क्यांनी वाढू शकतो. सध्या महागाई भत्ता हा ५३ टक्के आहे.

७ वा वेतन आयोग हा ३१ डिसेंबर २०२५ रोजी संपणार आहे. हा वेतन आयोग २०१६ मध्ये लागू करण्यात आला होता. दर दहा वर्षांनी वेतन आयोग लागू केला जातो. दरम्यान आठवा वेतन आयोग २०२६ मध्ये लागू होईल. आठव्या वेतन आयोगामुळे पेन्शनधारकांनाही फायदा होणार आहे. त्यांच्याही पेन्शनमध्ये वाढ होणार आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group