खुशखबर ! दिवाळीआधी सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात होणार वाढ; पगार आणि पेन्शनही वाढणार
खुशखबर ! दिवाळीआधी सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात होणार वाढ; पगार आणि पेन्शनही वाढणार
img
वैष्णवी सांगळे
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी खुशखबरअसणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. दिवाळीआधी केंद्र सरकार कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठी खुशखबर देणार आहे. सरकार सध्या आठवा वेतन आयोग लागू करण्याच्या तयारीत आहे. दिवाळीआधी सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता मिळू शकतो.

दरवर्षी दोनदा महागाई भत्ता वाढतो. आता सरकार जुलै ते डिसेंबर या काळातील महागाई भत्ता वाढवण्याची घोषणा करु शकते. यावेळी महागाई भत्ता ३ टक्के वाढण्याची शक्यता आहे. जर महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ झाली तर एकूण महागाई भत्ता ५८ टक्के होऊ शकतो. सध्या महागाई भत्ता हा ५५ टक्के आहे.यामुळे लाखो कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना फायदा होणार आहे.

पेन्शन वाढणार 
महागाई भत्ता हा तुमच्या बेसिक सॅलरीवर दिला जातो. त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी महागाई भत्ता वेगवेगळा वाढतो. जर तुमची पेन्शन ९००० रुपये असेल तर त्यावर ५५ टक्के महागाई भत्ता म्हणजे ४,९५० रुपये मिळतात. म्हणजे तुम्हाला १३,९५० रुपये पेन्शन मिळते. आता यात वाढ झाली तर महागाई भत्ता ५,२२० रुपये होईल. यामुळे पेन्शन १४,२२० रुपये होणार आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group