एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी...! महागाई भत्ता तब्बल 'इतक्या' टक्क्यांनी वाढणार
एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी...! महागाई भत्ता तब्बल 'इतक्या' टक्क्यांनी वाढणार
img
Dipali Ghadwaje
एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. सध्या ४६% असलेला महागाई भत्ता लवकरच ५३% पर्यंत वाढवण्याची शक्यता आहे. तसेच, वैद्यकीय योजनेतही मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्याची तयारी प्रशासन करत आहे. या दोन्ही निर्णयांमुळे एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो.

महागाई भत्त्यात वाढीची शक्यता :

सध्या एसटी कर्मचाऱ्यांना ४६% महागाई भत्ता दिला जात आहे. मात्र, सरकारी कर्मचाऱ्यांना लागू झालेला ५३% महागाई भत्ता लवकरच एसटी कर्मचाऱ्यांनाही लागू होणार असल्याची माहिती मिळाली आहे. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत या निर्णयावर चर्चा झाली असून, लवकरच यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी शक्यता आहे.

महागाई भत्ता ५०% पेक्षा जास्त झाल्यास, घरभाडे भत्त्यातही वाढ होण्याची शक्यता असते. सध्या तालुकास्तरावर ८% भत्ता मंजूर असला, तरी प्रत्यक्षात ७% दिला जातो आणि तोही वेळेवर मिळत नाही, अशी कर्मचाऱ्यांची तक्रार आहे. त्यामुळे ही वाढ कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते.  

 वैद्यकीय योजनेत महत्त्वाचे बदल :

सध्या असलेली आरोग्य योजना फक्त काही निवडक उपचारांपुरती मर्यादित आहे. नवीन प्रस्तावानुसार, ओपीडी खर्चाची भरपाई करण्याची योजना तयार केली जात आहे. यामुळे दररोजच्या आरोग्य गरजांमध्ये कर्मचाऱ्यांना थेट लाभ मिळू शकतो. ही योजना कॅशलेस पद्धतीने राबवण्याचे संकेतही मिळाले आहेत.

एसटीचे सरासरी उत्पन्न प्रतिदिन ₹२२ कोटी असूनही पगारात होत असलेला विलंब, थकीत भत्ते आणि वैद्यकीय सुविधांचा अभाव यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. वाढत्या दबावामुळे सरकारकडून महागाई भत्ता वाढ व आरोग्य योजना सुधारणा यावर लवकरच ठोस घोषणा होण्याची शक्यता आहे.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group