दैनिक भ्रमर : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. राज्य सरकारने महागाई भत्त्यात दोन टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सरकारच्या तिजोरीवर मात्र बोजा पडणार आहे.
राज्य सरकारने महागाई भत्त्यात २ टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यानंतर आता महागाई भत्ता ५३ टक्क्यांवरुन ५५ टक्क्यांवर झाला आहे. यासाठी १७०० कोटींचा निधी देण्यात आला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता लागू करण्याचे धोरण आहे. त्यानुसार वर्षभरात दोनदा महागाई भत्त्यात वाढ केली जाते. मागच्या वेळी १ जानेवारी २०२५ रोजी महागाई भत्त्यात २ टक्क्यांनी वाढ केली होती. त्यानंतर आता जुलै महिन्यात महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे.