महाराष्ट्रात गुन्हेगारांना राजाश्रय ? पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्याला मिळाली राष्ट्रवादीची उमेदवारी
महाराष्ट्रात गुन्हेगारांना राजाश्रय ? पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्याला मिळाली राष्ट्रवादीची उमेदवारी
img
वैष्णवी सांगळे
राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीची रणधुमाळी सुरु आहे. नगर पंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणूका जाहीर झाल्या असून उमेदवारांनी अर्ज देखील दाखल केले आहेत. दरम्यान, चिखलीतील एका उमेदवाराची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. पत्नीला जाळून टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्याला राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्याने चर्चांना उधाण आले. त्याला उमेदवारी दिलीच कशी असा प्रश्न आता अनेकांना पडलाय. 

चिखली शहर युवक काँग्रेसचा अध्यक्ष असलेल्या विशाल उर्फ रिकी काकडेवर पत्नी नमिता काकडेने ९ नोव्हेंबर रोजी तक्रार दाखल केली. त्यानंतर विशाल काकडेला अटक करण्यात आली. तो अद्याप न्यायालयीन कोठडीत आहे. मात्र विशाल काकडेने न्यायालयाच्या परवानगीने नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग 13 अ मधून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 

विशाल काकडेने न्यायालयीन कोठडीत असताना पोलीस संरक्षणात येऊन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पत्नीला जाळणाऱ्या रिकी काकडे याने राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्याच्या विरुद्ध षडयंत्र रचले जात असल्याचा दावा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांनी केला आहे.

नेमकं काय घडलं होतं?
विशाल काकडे आणि नमिता काकडे यांचा 2020मध्ये विवाह झाला आहे. त्यांना दोन मुले आहेत. नमिता ही नगर परिषदेमध्ये सफाई कामगार म्हणून काम करत आहे. पतीचे बाहेर कुठे तरी अफेअर असल्याचा संशय तिला होता.नमिताने विशालला याविषयी विचारले तर त्याचा राग टोकाला पोहोचला. त्याने पत्नीचा अंगावर पेट्रोल ओतरले. नंतर तिला पेटवण्याचा प्रयत्न केला. नमिताने प्रसंगावधान राखत पेट्रोलने भिजलेली साडी पाण्याने भिजवली. त्यामुळे तिचा जीव वाचला.
इतर बातम्या
Join Whatsapp Group