येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्री राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. यासाठी देशभरात मोठ्या प्रमाणात तयारी सुरु आहे.दरम्यान भाजप आमदार राम कदम यांनी राम मंदिर प्रतिष्ठापना दिवशी महाराष्ट्रात एक दिवसासाठी दारू आणि मांसबंदी करावी, अशी मागणी केली आहे.
काय म्हणाले राम कदम?
राम कदम म्हणाले आहेत की, 22 जानेवारी रोजी अयोध्येत फार मोठ्या संघर्षानंतर राम मंदिर भव्य आणि दिव्य स्वरूपात उभं राहत असून प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठापना होत आहे. 450 वर्षांच्या संघर्षानंतर कोट्यवधी राम भक्त ही दिवाळी साजरी करणार आहे. या पवित्र दिनी महाराष्ट्रात एक दिवसासाठी दारू आणि मांसबंदी करावी, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे.
ते म्हणाले आहेत की, ''महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला सांगून संपूर्ण देशात 22 जानेवारी रोजी दारू आणि मांसबंदी करावी, अशी मागणी कोट्यवधी राम भक्तांची आहे.''